पंढरपूर प्रतिनिधी
गादेगाव ग्रामपंचायत च्या वतीने विरोध पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांना विकास निधी बाबत निवेदन देण्यात आले गादेगाव मधील काही भागांमध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सदर रस्त्यांना निधी अभावी काम करता येत नाही त्यामुळे रस्त्याची दुरावस्था दिवसेंदिवस वाढतच चालली आहे या रस्त्याबाबत प्रवीण दरेकर यांना उपसरपंच गणपत मोरे, यांनी निवेदन दिले.
यावेळी मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, अनिल बागल, विनोद बागल उपस्थित होते. यावेळी दरेकर यांना निवेदन देऊन आपल्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली.
यावेळी दरेकर म्हणाले, की मी स्वतः ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याकडून 25/15 मधून रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले .या आश्वासनामुळे गादेगावकरांच्या अशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.