भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माळावरील श्री भवानी देवीची यात्रा आजपासून सुरू झाली या यात्रेस भाविक भक्तांनी उदंड असा प्रतिसाद दिला.अशी माहिती सरपंच राजकुमार पाटील यांनी तेज न्यूज शी बोलताना दिली.
यावेळी पाटील म्हणाले की मागील 02 वर्षात कोरोनाची साथ असल्यामुळे यात्रा भरली नव्हती यावर्षी ही यात्रा रविवारी आल्यामुळे या यात्रेतच बाजार भरवण्यात आला होता तसेच रविवारी सुट्टी असल्यामुळे विशेषतः लहान मुलांना या यात्रेचा आनंद घेत आला यात्रेत लहान मुलांच्यासाठी रेल्वे, मिकी माऊस ,पाळणे ,खेळणे, हॉटेल अशी वेगवेगळी व्यवसाय करणारी दुकाने असल्यामुळे भाविकांना मनसोक्तपणे यात्रेचा आनंद घेता आला. यात्रेचा उद्या शेवटचा दिवस असून यावेळी विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तरी भावीक भक्तांनी याही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच राजकुमार पाटील यांनी केले आहे.
यावेळी यात्रा कमिटीने दर्शन रांगेची व्यवस्था अतिशय चांगली केल्यामुळे भाविकांना दर्शन घेता आले.विविध प्रकारच्या दुकानाची बैठक व्यवस्था अतिशय चांगली केल्यामुळे भाविकांना खरेदी विक्री करता येत होती.
यावेळी यात्रा कमिटीने व पोलीस अधिकारी जगताप,जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे यात्रा शांतेत पार पडली.