पंढरपूर प्रतिनिधी
आज पंढरपूर येथे रेस्ट हाऊस मध्ये सोलापूर जिल्हातील शेतकरी संघटनेची एकत्र बैठक आयोजित केली होती यावेळी रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बळीराजा शेतकरी संघटना, जनशक्ती शेतकरी संघटना व इतर शेतकरी चळवळीत काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते येणार्या ऊस हंगामात शेतकर्याना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे कारण गेली 4 - 5 वर्षे झाली ऊस आंदोलन झाली नसल्याने त्याचा फायदा सोलापूर जिल्हातील साखर कारखानदाराने घेतला .
कारण शेजारी पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा सांगली जिल्हा असेल त्याठिकाणी उसाला प्रती टन 2700 रुपये पासून 3300 रूपये भाव मिळतो मग आपल्या सोलापूर जिल्हात का मिळत नाही अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यानी व्यक्त केली अणि एकत्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आम्ही आज ऊस दर आंदोलन संघर्ष समिती स्थापन केली या समिती मध्ये सर्व शेतकरी संघटनेचे दोन दोन पदाधिकारी घेतलं आहेत.
आम्ही सोलापूर जिल्हातील ऊस पट्यात जाऊन शेतकर्याना जागृत करून ऊस आंदोलन मध्ये सामील व्हा असे आव्हान करणार आहोत येत्या 23/10/2022 रविवार संध्याकाळी 6 वाजता पंढरपूर येथील शिवाजी चौकात सोलापूर जिल्ह्याची ऊस परिषद घेणार आहोत आणि येणार्या हंगामात उसाला पहिली उचल किती घ्यायची हे जाहीर करणार आहोत.
यावेळी दिपक भोसले, माऊली हळणकर, सचिन पाटिल, समाधान फाटे,नितीन बागल,माऊली जवळेकर,निवास नागणे,प्रा सुहास पाटिल, सचिन आटकळे,नंदकुमार व्यवहारे, छगन पवार, गोपाळ घाडगे ,राहूल बिडवे, संभाजी उपासे, समाधान गाजरे, गणेश देशमुख, विठ्ठल मस्के इतर महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.