पंढरपूर प्रतिनिधी
श्री.रुक्मिणी विद्यापीठाच्या सांगोला नाक्यावरील जागेत मातोश्री ईश्वराम्मा ज्युनियर कॉलेज पंढरपूरच्या वतिने बोधी वृक्ष पिंपळाच्या झाडाची विधीवत पूजा करून परमपूज्य श्री द्वारकानाथ साई स्वामी महाराज यांचे शुभहस्ते वृक्षारोपण केले.
यावेळी साई स्वामी म्हणाले की हे पर्यावरण पूरक झाड असल्याने भविष्यात या झाडामुळे परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून ज्ञानदानाचे कार्यही या विद्यापीठात वाढणार आहे असे स्वामींनी सांगितले तर भगवान श्रीकृष्णासारखे हुशार संस्कारक्षम व संस्कृती जपणारे विद्यार्थी येथे घडविण्याचे कार्य या संस्थेतील शिक्षकांच्या हातून जास्तीत जास्त होईल असे सांगून अशा अक्षय वृक्षांची लागवड सर्वत्र व्हावी अशी आशा व्यक्त केली.
तसेच संस्था सचिवा सौ .सुनेत्राताई पवार म्हणाले की गावागावात असणारे विविध समाजातील गोरगरीब वर्गांना दिवाळी फराळ, कपडे देऊन ही दिवाळी साजरी करावी तर फटाके मुक्त व प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थापक सचिवा सुनेत्राताई पवार संस्था मार्गदर्शक विजयसिंह पवार. जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय पवार प्राचार्या नंदिनी गायकवाड, मुख्याध्यापक संतोष कवडे यांचे सह श्री सत्यसाई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश डुबल यांनी केले. तर आभार इरफान शेख यांनी माणले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय भंडारे ,महेश भोसले ,धनाजी जाधव, सुधीर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.