पंढरपूर प्रतिनिधी
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली संचलित , वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांतील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची राष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू कु. प्रीती अशोक काळे हिने खेलो - इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल आज रविवार दि. १६ आॕक्टोंबर २०२२ रोजी विद्याप्रतिष्ठान बारामती येथे महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व K K SPORT'S चे मार्गदर्शक कल्याणराव काळे , सचिव बाळासाहेब काळे गुरुजी उपस्थित होते.
यावेळी भविष्यातील वाटचालीसाठी अजितदादा पवार यांनी प्रीती काळे हिला शुभेच्छा देऊन जिद्द मेहनत व परिश्रमाने अधिक यश मिळवत रहा असे सांगून आशीर्वाद दिले.