पंढरपूर प्रतिनिधी
दि. ३ ऑक्टोबर सहकारातून सामाजिक व आर्थिक विकास साधणारे पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित उमा शिक्षण संकुल पंढरपूर येथे विद्यार्थ्यांच्या चौफेर ज्ञानाला, कलेला, अभ्यासाला व समाजभिमूख विचारधारेला एक योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सोमवार दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी श्री. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मा. आ. श्री. प्रशांतराव परिचारक उपाध्यक्ष मा. श्री मुकुंदराव परिचारक, सचिव मा. श्री. राजगोपाल भट्टड, संस्थेचे विश्वस्त मा. श्री. सी.एम. दोशी, मा. श्री. भैय्यासाहेब जाहागिरदार, मा. श्री. रमेश लाड, मा. श्री. प्रणव परिचारक व उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी सोशल मिडिया आणि आजची तरुणाई, स्वातंत्र्याची ७५ वर्ष- काय कमावले काय गमावले ? संत साहित्याची सामाजिक फलश्रृती, स्त्रीशक्ती - काल, आज आणि उद्या, कोरोना-आपत्ती की इष्टापत्ती,बहुआयामी व्यक्तिमत्व-कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक असे विषय देण्यात आले होते. राज्यातील विविध - महाविद्यालयातील ५३ स्पर्धक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उस्फुर्त सहभाग घेतला व आपल्या वक्तृत्व कलेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ७००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३००० रुपये व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आली होती. बहुआयामी व्यक्तिमत्व - कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक या विषयासाठी विशेष पारितोषिक ठेवण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.
या आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अशोकराव माने ग्रुप ऑफ इंस्टिटयूट कोल्हापूरच्या गणेश अशोक लोळगे या विद्यार्थ्यांने प्राप्त केला. द्वितीय क्रमांक श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय, सांगलीच्या कु. प्रज्ञा श्रीकांत माळकर या विद्यार्थीनीने प्राप्त केला. तृतीय क्रमांक आप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे येथील रोहन ज्योतीराम कवडे या विद्यार्थ्यांने मिळविला व भारती विद्यापीठ इन्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट सांगली येथील शिवम संजय माळकर व एच.पी.टी. कला व विज्ञान महाविद्यालय नाशिकच्या कु. श्रुती अशोक बोरसे या दोन विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. बहुआयामी व्यक्तिमत्व सुधाकरपंत परिचारक या विषयासाठी ठेवण्यात आलेले विशेष पारितोषिक स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर येथील तेजस राजस पाटील या विद्यार्थ्याने प्राप्त केले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रकमेचे पारितोषिक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, उमा महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बाड डी. आर. उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पांढरे व्ही.डी. व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, डॉ. श्री. सचिन लादे श्री. दिपक इरकलसर व श्री. सोमनाथ गायकवाड सर यांनी आपले बहुमोल योगदान दिले.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संयोजन समिती सदस्य प्रा. डॉ. पवार के.के., प्रा.बागवान एन.एस., प्रा. देशपांडे ए.जी., प्रा. देशपांडे एस.एच, प्रा. सौ. दाभोळकर व्ही.एस., प्रा. सौ. दूधभाते एस.एस., श्री. सुर्यकांत पारखे व अधिक्षक शशिकांत दुनाखे तसेच उमा शिक्षण संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.