मुंबई प्रतिनिधी
परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीत एसटी महामंडळाला अधिक भक्कम करण्याबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
यानुसार एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार असून या माध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी संपाच्या काळात बडतर्फ करण्यात आलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे निर्देशही याप्रसंगी महामंडळाला दिले.
यासमयी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते.