आयुष्यातली पहिली लंडनवारी जी माझ्या कलेमुळे मला घडली. कला ही देवाने दिलेली देणगी पण त्या देणगीच सोनं करता आलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांमुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकामुळे त्यासाठी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद
आपल्या कलेमुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची संधी मिळते आणि त्याच सोनं मी नक्कीच करेन आणि करत आहेच हे काम जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला आवडेल एवढी शास्वती नक्की देऊ शकते.
लंडनमध्ये काम करताना मजा येत आहे वेगळा अनुभव मिळतोय. नवीन टीम सोबत आणि co-artist बरोबर काम करत आहे सगळेच खूप चांगल काम करतायेत आणि त्यांच्यामुळे माझंही काम चांगल होतय.
फक्त तुमच्यापासून थोडं लांब आल्याची जाणीव होते कारण आठवण येते आपल्या घराची, फॅमिली, फ्रेंड्स आणि प्रेक्षकांची दोन्ही देशातल्या वेळेमध्ये फरक असल्यामुळे co-ordinate करता येत नाही. पण काळजी करू नका लवकरच परत येत आहे इथलं काम संपवून....
लंडनवारी मधला मजेशीर किस्सा तुमच्याशी share करायचा आहे. खरं तर आयुष्यात घेतलेली रिस्क होती ती पण माझ्या आवडीसाठी आणि wishlist मध्ये ही गोष्ट होती म्हणून मला ती करायची होती
सध्या लंडनमध्ये खूप थंडी आहे (7° to 8°C ) इथली माणसं गुडघ्यापर्यंत बूट, जॅकेट्स, ओव्हरकोट, स्कार्फ,कॅप असं घालून फिरतात. मी घरून येतानाच साडी घेऊन आले होते मला इच्छा होती लंडनमध्ये मी साडी घालून फिरावं कारण साडी हा माझा सगळ्यात आवडीचा पोशाख आहे.
एक दिवस off मिळाला तेव्हा सगळ्यांचं ठरलं जरा लंडन फिरून येऊयात मी छान तयार होऊन साडी घालून खाली आले तेव्हा सगळे शॉक "तू साडी घातलीयेस???" हा प्रश्न होता सगळ्यांचा तेव्हा वाटलं अरे इथल्या लोकांना माझ्याकडे बघताना awkward तर नाही वाटणार ना पण म्हणलं नाही मला भारी वाटतंय ना मग बास आणि इथल्या लोकांना कळावं एक मुलगी साडीमध्ये कशी दिसते आणि स्त्री ची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते.
आम्ही windsor ला गेलो न झालं असं गेल्यापासून परत येईपर्यंत तेथील सगळी माणसं,लहान मुले माझ्याकडे प्रेमाने, कुतूहलाने आणि कौतुकाने बघत होते तेव्हा खूप special feel झालं जास्त special तेव्हा वाटलं काही लोकं यायचे आणि म्हणायचे "Can i take picture with u, ur looking so beautiful" आणि विचारायचे हे काय आहे याने खूप सुंदर दिसताय तुम्ही. लंडनमध्ये माझी आवड मला जपता आली आणि इथल्या लोकांचा आनंद मला अनुभवता आला त्यांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटलं.
माझ्या लंडनवारी मधला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या नवीन प्रोजेक्टला आणि टीम ला शुभेच्छा द्यायला विसरू नका.
साभार फेसबुक वरून