सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी प्रा. सचिन चव्हाण,गणेश घोगले,विद्यानंद बाबर,गौरीशंकर आतनूरे, दामोदर भुसणर आदी उपस्थित होते.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.