मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
पुणे येथील देवन नवले यांचे पिताश्री दिवंगत पोलीस अधिकारी दिंगबर नवले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने पुत्र देवेन त्यांच्या पत्नी देवश्री, बहिणी संगीता, माधुरी आणि भाचे मंडळी आदी नातेवाईकांनी एकत्र येत पौड रोड पुणे येथील अरई टेकडीवर बदाम, औदुंबर, कांचन, जांभूळ व इतर अनेक वृक्ष केशव सीता या सामाजिक ट्रस्ट च्या माध्यमातून लावून हा उपक्रम हाती घेतला. झाडे आपल्याला वर्षभर फळं फुलं देतात व वृक्षासारखा मित्र नाही, ट्रीज आर our लाईफ टाईम फ्रेंड असतात.
B bbत्यामुळे आम्ही वडिलांचा प्रथम स्मृतिदिन एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केल्याचं मनापासून समाधान असल्याचं देवेन नवले यांनी सांगितलं व नियमितपणे या झाडांची काळजी घेणार असल्याचं नमूद केलं.नवले कुटुंबियांच्या या अनोख्या उपक्रमाचे पुण्यात सर्वत्र कौतुक होत आहे.