मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व ) येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ. ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन साजरा करण्यात आला .
या दिवशी शाळेच्या प्रांगणात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी डॉक्टर कलाम यांच्या जीवना विषयी निरनिराळी पुस्तके मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. मुलांसाठी वाचन कट्टा तयार करण्यात आला.
या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर, प्रशासकीय अधिकारी अशोक परब, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मनाली परब, पर्यवेक्षक जगदीश सूर्यवंशी, अधिवेशन प्रमुख राजेंद्र निळे, विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.
सुरक्षा घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व तसेच डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याकडून संघर्ष वृत्ती व संशोधन वृत्ती घ्यावी असे आवाहन केले.मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे व मनाली परब यांनी वाचन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.