स्टॉलधारकांकडे परवानगी नसतानादेखील बोर्ड प्रशासनाची स्पेशल डोळेझाक
खडकी प्रतिनिधी
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये दुकानदार बाहेर अनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉल लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांसाठी काही स्टॉलधारक चक्क घरगुती गॅस सिलिंडर वापरत आहेत. खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणाऱ्या स्टॉल धारकांकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नसल्याचे समजते. परवाने नसताना देखील खाद्यपदार्थ स्टॉलधारकांकडून दररोज भाडे गोळा करणाऱ्या दुकान चालकांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
बोर्डाच्या हद्दीमध्ये खाद्यपदार्थ असणारे अनेक लहान हॉटेल, पार्लर आहेत, या हॉटेल तसेच स्नॅक्स सेंटरच्या समोरच्या बाजुला अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. संबंधित स्टॉलधारकांकडून दररोज सुमारे २०० ते ३०० रुपये प्रमाणे हॉटेल तसेच स्टॉलधारक पैसे वसूल करतात. विशेष म्हणजे आइस्क्रीम पार्लरच्या दुकानासमोर ७ ते ८ स्टॉल लावण्यात येतात. मुख्य म्हणजे आइस्क्रीम पार्लरचे दुकान भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱयाची असल्याचे नागरिकांनी सांगितले. दुकानाबाहेर लावण्यात येणारे स्टॉलधारक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चक्क घरगुती सिलेंडरचा वापर करीत असल्याचे दिसते.
बोर्ड प्रशासनाच्या डोळ्यादेखत घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याने बोर्ड प्रशासन मात्र चक्क डोळेझाक करीत आहेत. हॉटेल तसेच दुकानदारांकडे बोर्ड प्रशासनाचे परवाने आहेत, मात्र भाडेतत्त्वावर देण्यात आलेले स्टॉल धारकांकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नसल्याचे समजते.
चहा, वडापाव, जिलेबी, चायनीज मंचुरिअन, इडली सांबर, पान तसेच ज्यूसचे स्टॉल भाडय़ानी भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. बोर्डाच्या जागेवर दुकानाबाहेर लावण्यात येणार्या स्टॉलधारकांकडून संबंधित दुकानदार तसेच आईस्क्रीम पार्लर दुकानदार मोठ्या प्रमाणावर पैसे कमवित आहेत. संबंधित दुकानदारांचे अधिकाऱ्यांची आर्थिक हितसंबंध असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई करीत करण्यात येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे कोणतेही प्रकार परवाने नसतानादेखील बोर्ड प्रशासनाच्या वतीने याकडे स्पेशल डोळेझाक होत आहे. परवाने नसतानादेखील स्टॉलधारक खाद्यपदार्थ कसं विकू शकतात असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व अनधिकृत स्टॉलधारकांची तपासणी करून संबंधितांकडून दंड वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खडकीकर करीत आहेत.
हॉटेल तसेच पार्लरच्या समोर लावण्यात येणारे अनेक स्टॉलधारकांची तपासणी करणार आहोत. संबंधित स्टॉलधारकांकडून परवान्याबाबत सखोल चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई करणार आहोत.
शिरीष पत्की ,आरोग्य अधीक्षक