पंढरपूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणूक 2022 निवडणूक जशी जवळील तशी निवडणूक रंगतदार होत चालले आहे .
आज पंढरपूर येथील जाहीर सभेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर कॉलेजमधील पदवीधर मधून उभे असलेले संजय मुळे या उमेदवाराने जाहीरपणे सुटा संघटनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देऊन आपली उमेदवारी मागे घेतले आहे .संघटनेचे सर्व पदाधिकारी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज येथे उपस्थित होते यावेळी सभेचे ठिकाणी संजय मुळे यांनी सुटा संघटनेबरोबर राहण्याची भूमिका स्पष्ट केली .
या पाठिंबामुळे पंढरपूर तालुक्यामधून सुटाचे ओपन मधून एकमेव उमेदवार असणारे गणपत मोरे यांना नक्कीच फायदा होणार आहे .त्याचबरोबर सुटाचे एकूण नऊ उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांना या पाठिंबामुळे चांगलाच फायदा होणार आहे .
या सभेसाठी सुटा संघटनेचे अध्यक्ष नितीन कोकाटे ,हनुमंत अवताडे ,विश्वस्त मठपती ,सर भरत जाधव, बुरमे सर ,पंचाप्पा वाघमारे, राजेंद्र सूर्यवंशी , संभाजी ब्रिगेडचे किरण राज घाडगे , युवानेते अमरजीत पाटील ,पदवीधर चे उमेदवार गणपत मोरे , दिनेश खुळे, उषा पवार , प्राध्यापक सुशील कुमार शिंदे व प्राध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सिनेट साठी 29 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.