माळशिरस प्रतिनिधी जयराम घाडगे
माळशिरस तालुक्यातुन श्रीमती प्रभावती उबाळे सोनार व राऊत यांना जि.प सोलापुर म. व बा.क .विभागाचे सन २०१९/२० चे आदर्श सुपरवायझर माळशिरस तालुक्यातुन पिलीव बीटच्या श्रीमती राऊत,मांडवे २ च्या श्रीमती सोनार व दहिगाव २ च्या श्रीमती प्रभावती उबाळे यांना व प्रत्येकि ३ सेविका व मदतनिस यांना जि.प सोलापुर यांचे वतीने आज जामखंडी मंगल कार्यालय सोलापुर येथे मुख्य कार्य. अधिकारी दिलीपराव स्वामी यांचे शुभ हस्ते व म.व बा.क.चे डेप्युटी सि.ई.ओ.जावेद शेख, माळशिरस मंगलाताई वाघमोडे अनेक मान्यवर पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती प्रभावती उबाळे यांना मिळालेल्या या पुरस्काराने हँटस्टीक साधली आहे यापुर्वी मराठा महासंघ माळशिरस, जि.प. सोलापुर यांचा यापुर्वी आदर्श अ.सेविका व आताच्या या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.यामुळे त्यांच्या २१वर्षाच्या सेविका व २०१२पासुन सुपरवायझर पदाच्या कार्याचे सार्थक झाले.सर्वच स्तरातुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या मिळालेल्या पुरस्काराबद्दल मा.खा. विजयसिंह मोहिते पाटील नंदिनिदेवी विजयसिंह मोहिते पाटील,सह.महर्षि सा.का.चे चेअरमन बाळदादा मोहिते पाटील,जि.प.चे माजी अध्यक्ष व क्रुषी ऊ.बा.समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,ऊद्योग रत्न श्रीमती स्वंयप्रभादेवी उ. मोहिते पाटील,पं. स .सदस्य, सर्वेसर्व अर्जुनसिंह व . वैष्णवीदेवी मोहिते पाटील,महाराष्ट कुस्तीगीर परिषदेचे उपाध्क्ष डाँ.धवलसिंह मोहिते पाटील,माळशिरस म.व बा. क. चे सि.डी.पि.ओ. अल्लडवाढ . बी.डि.ओ. खरात व कार्यालयीन सर्व सहकारी बीट मधील सर्व सेविका व मदतनिस यांनी विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .
पत्रकार व सा. शिवार वार्ताचे संपादक श्री.तुकाराम ग.उबाळे यांच्या त्या पत्नी आहेत सर्वच स्तरातुन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.