पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या कुमारी श्रद्धा सुहास तानवडे हिची कॅम्पस मुलाखतीतून "लेक्सीकाॅन नेटवर्क" कंपनीत निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
"लेक्सीकाॅन नेटवर्क" कंपनीचे शिकागो येथे स्थित (हेडक्वार्टस) साॅफ्टवेअर कार्यालय असुन भारत, पुणे, बाणेर येथे ब्रँच आहे. या कंपनीमध्ये भारतातील २०० हुन अधिक कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत. हि कंपनी विविध सर्विसेस प्रोव्हिड करते. त्यापैकी काही सर्विस आयबीएम अँप कनेक्ट, कस्टम मोबाईल अँप डेव्हलपमेंट, सीआरएम, इआरपी, पीएलएम, आयओटी सह अनेक सर्विसेस "लेक्सीकाॅन नेटवर्क" कंपनी देत आहे. अशा या कंपनी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेल्या कुमारी श्रद्धा तानवडे हिची "लेक्सीकाॅन नेटवर्क" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून तिला वार्षिक ३ लाख रूपये पगार मिळणार आहे.
"लेक्सीकाॅन नेटवर्क" कंपनीत निवड झाल्याबद्दल कुमारी श्रद्धा तानवडे हिचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

