पंढरपूर प्रतिनिधी
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंञालयात झालेल्या बैठकीत पंढरपूर एमआयडीसी संदर्भात जागेची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, त्यानुसार अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील वाखरी, कासेगाव व रांझणी येथील जमिनीची स्थळ पाहणी केली. यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक,उपविभागीय अधिकारी गजानन गुरव,तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे या पाहणी दौऱ्यात होते.
या तीनही ठिकाणी असलेली जमीन, पाण्याची उपलब्धता व एमआयडीसी उभारणीला लागणाऱ्या इतर आवश्यक बाबीची तपासणी या अधिकाऱ्यांनी केली. या पाहणी दौऱ्याचा अहवाल उद्योगमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
यावेळी मा. श्री आमदार समाधान आवताडे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.भास्कर कसगावडे,किसन सेलचे श्री. माऊली हाळवणकर,श्री.बादलसिंग ठाकूर,श्री.अक्षय वाडकर,श्री. धीरज म्हमाणे व इतर विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.