पंढरपूर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचेकडून बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी आपटे उपलप प्रशालेतील विद्यार्थ्यांना कंपास पेटी वाटप करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर रोटरी क्लब कडून यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शालेय साहित्य वाटप करत आहे. बुधवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने आपटे उपलप प्रशालेत विद्यार्थ्यांना कंपास पेटी वाटप करण्यात आली.
या दरम्यान रो. डाॅ. उषा अवधूतराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर चे माजी अध्यक्ष रो. किशोर निकते, विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, संजय कपडेकर, सोमेश गानमोटे, डाॅ. संगीता पाटील, पाटील मॅडम आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलकर्णी मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत हरिदास यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुलाखे सर, गंगेकर सर, आदमिले सर यांनी परिश्रम घेतले.