सोलापूर प्रतिनिधी
बोरामणी-दक्षिण सोलापूर तालुक्यातील एस व्ही सी एस हायस्कूल, बोरामणी येथे शिक्षण घेत असलेल्या परगावच्या विद्यार्थिनींना प्रशालेकडून सायकल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मा मुख्याध्यापक श्री राम ढाले सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी मा श्री मल्हारी बनसोडे साहेब हे होते.
प्रमुख पाहुणे तथा मा गटशिक्षणाधिकारी श्री बनसोडे साहेबांच्या शुभ हस्ते प्रशालेतील अकरा विद्यार्थिनींना सायकलीचे वाटत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी साहेबांच्या सायकल बँकेच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद देऊन अकरा सायकलीचे वाटप केल्याबद्दल प्रशालेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ढाले सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,आपल्या आवाहनाला प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सायकल घेण्यास योग्य प्रतिसाद दिल्याने हे शक्य झाले असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही सायकल बँकेसाठी सायकल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक श्री शिवप्पा बिराजदार सर,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंत राजमाने सरांनी केले.