राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन यावेळी उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचाही करण्यात आला सत्कार
मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ निमित्त निकाली काढण्यात आलेल्या अर्जातील पात्र लाभार्थ्यांना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच शिधावाटप दक्षता समितीचे अध्यक्ष रविंद्र वायकर यांच्या हस्ते शिधापत्रिकांचे वाटत करण्यात आले. यावेळी शिधावाटप कार्यालय क्र.२६ड चे शिधावाटप अधिकारी अ.शं. रोहिणीकर, नायब तहसिलदार श्रीमती नेहा हिर्लेकर, दिनेश गुरव आदी उपस्थित होते.
जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत यासाठी राज्य शासनाने २०१५ मध्ये ‘आपले सरकार पोर्टल’सुरू केले. त्यानुसार शिधावटप कार्यालयाशी संबंधित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २००२ या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पात्र ठरलेल्या शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यालयातील कर्मचार्यांचा ही वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिधापत्रिका मिळाल्याने शिधापत्रिकाधारकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.