सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल विभागातील ' मेसा ' या विद्यार्थी संघटनेकडून अभियंता दिनानिमित्त 'अॅटिट्यूड इज एव्हरीथिंग ' या विषयावर व्याख्यानसंपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.मोहन देशपांडे फॉउंडर डायरेक्टर अँड चिफ ट्रेनर ऑफ एसीई सॉफ्ट स्किल सोल्युशन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सर विस्वेश्वाराया यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शेखर जगदे व रवींद्र व्यवहारे यांनी प्रथमता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रा. मोहन देशपांडे यांनी 'अॅटिट्यूड ' चे महत्व त्यांनी समर्पक उदाहरणे देऊन सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेसा कॉओर्डीनॅटर प्रा. योगेश शेटे, श्रीकांत जगताप व मेसा संघटनेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नोमान शेख आणि वैष्णवी जगताप यांनी केले.