सोलापूर प्रतिनिधी
दिनांक 8 ते 12 सप्टेंबर दरम्यान लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा, पंजाब येथे झालेल्या सीनियर राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र बेसबॉल संघाने सुवर्णपदक प्राप्त केले त्या संघातील सोलापूरचे अक्षय हावळे व सिताराम भांड यांचा सत्कार सोलापूर शहर मध्ये चे कार्यतत्पर आमदार मा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले व याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर शहर व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक सीए विनोद भोसले हे उपस्थित होते
महाराष्ट्र संघाने पहिला साखळी गटातील सामना गुजरात विरुद्ध 10 -0 होम रन, ओडिसा विरुद्ध 11-1 होम रन, उप उपांत्य सामना राजस्थान विरुद्ध 10-0 ,उपांत्य सामना चंदिगड विरुद्ध 2-0 व अंतिम सामना पंजाब विरुद्ध 3-2 होमरने जिंकून सुवर्णपदक पटकाविले
या संघामध्ये अक्षय हावळे याने थर्ड बेस करून उत्कृष्ट हीटिंग केली तसेच सिताराम भांड यांनी उत्कृष्ट पिचिंग करून संघास विजेतेपद पटकावण्यामध्ये मोलाची कामगिरी केली
या खेळाडूंना अशोक सरोदे प्रा. संतोष गवळी ,प्रा. संतोष खेंडे, मारुती घोडके यांनी मार्गदर्शन केले
या खेळाडूंचे अभिनंदन महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे महासचिव राजेंद्र इखनकर , ज्ञानेश काळे ,राजेंद्र बनसोडे सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक सीए विनोद भोसले, उपाध्यक्ष प्रा. संतोष गवळी, सचिव प्रा . संतोष खेंडे ,सहसचिव प्रवीण बिराजदार ,राजाराम शितोळे, प्रशांत राणे ,गंगाराम घोडके, प्रशांत कदम व शिवाजी वसपटे यांनी केले