विकासवाडी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील विकासवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून शाळेचे प्रवेशद्वार (गेट) तयार करून बसविण्यात आले आहे .त्याचप्रमाणे ग्रामपंचायत धोंडेवाडी यांचे कडून शाळेच्या ग्राउंड मध्ये पाच ब्रास ब्लॉक बसविण्यात आले आहेत .
शाळेला केलेल्या मदतीबद्दल ग्रामपंचायत धोंडेवाडी ,सर्व ग्रामस्थ, पालक ,सर्व शिक्षणप्रेमी नागरिक व पदाधिकारी यांचे विकासवाडी शाळेमार्फत खूप खूप कैतुक केले जात आहे. या शाळेचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.