पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 14 प्रशिक्षणार्थींची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे गुजरात येथील सुझुकी कंपनीत निवड झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी सारख्या ग्रामीण भागात आलेल्या वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुजरात येथील नामांकित सुझुकी कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केले होते.
यामध्ये संस्थेतील सचिन चवरे ,संदेश काळे ,किरण सुरवसे ,प्रतीक लोखंडे ,प्रताप नागणे, रोहित काळे ,कुंदन नामदे ,चैतन्य जगदाळे ,विक्रम माळी ,अभिषेक भानवसे, प्रदीप कांबळे, सुरज जाधव, दत्ता लामकाने, सुयोग कारंडे, या 14 जणांची निवड झाली.
यापूर्वीही दरवर्षी या प्रशिक्षण संस्थेतील बहुसंख्य प्रशिक्षणार्थींची देशभरातील नामवंत आणि अग्रेसर असणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झालेली आहे. त्यामुळे या प्रशिक्षण संस्थेचा नावलौकिक सर्व दूर पसरलेला असल्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातीलही बहुसंख्य प्रशिक्षणार्थी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी प्राधान्याने पसंती देऊन या संस्थेत प्रवेश घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
यावेळी या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे,उपाध्यक्ष बाळासाहेब काळे सचिव चंद्रकांत कुंभार व कॉलेज प्राचार्य गुळवे एस. एस. यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी शिक्षक,कर्मचारी, पालक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.