*भाळवणीत यशकिर्ती क्लासेस व आयुष लॅबकडून मुलीची हिमोग्लोबिन तपासणी*
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील किर्ती कॉम्प्युटर्स संचालक राहुल ताठे व राज लिंगडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आयुष पॅथालॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबर मुलांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने मुलांची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबीर आयोजित केले होते. तसेच विद्यार्थ्यांना वह्या व पेन यांचे ही वाटप करण्यात आले.
यावेळी कर्मयोगी विद्यानिकेतन शेळवेचे प्राचार्य राज शिंदे ,दामाजी एक्सप्रेसचे पत्रकार प्रशांत माळवदे,आनंद देशपांडे ,आयुष लॅबचे डॉ.वैभव लिंगे,यशकिर्ती क्लासचे शिक्षक भोसले ,आयवळे ,अमोल लिंगे , सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले मुली जास्त अभ्यास करतात पण आपल्या आरोग्यकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आजारी पडतात. अभ्यासा बरोबर आरोग्या कडे हि लक्ष दिले पाहिजे.