स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी महेश आटोळे व त्याच्यासोबत असलेले एक पत्रकार यांना वाळूमाफियांची मारहाण.
अवैध वाळू उपसा सुरू होता याच वार्तांकन करण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश आटोळे आणि पत्रकार मित्र गेले त्यानंतर इथलं शूटिंग घेऊ नको इथून तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही तू कोणाला काय सांगायचं ते सांग आमचं कुणी काहीच करू शकत नाही. आमचे वरपर्यंत हाथ आहेत असे प्रकारचे वक्तव्य वाळू माफियांनी केले. त्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल , कॅमेरा, ओळ्खपत्र काढून घेतले त्यांना बंदुकीचा धाक दाखवण्यात आला त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून पैशाचे अमिश देण्यात आलं. मात्र त्यांनी त्याचा स्वीकार न करता पत्रकारांनी स्वतःची सुटका करून बारामती शहर पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनला तक्रार दिली. अवघ्या 2 तासात बारामती पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. अन्य 9 आरोपींचा तपास पोलीस करत आहेत. अजून फरार आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.