पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचालनालाय. महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालय ,जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व सांगोला बास्केटबॉल असोशियशन यांच्या सहकार्याने आयोजित 19 वर्षीय शालेय जिल्हास्तर बास्केटबॉल स्पर्धा दि 15/10/ 2026 सांगोला विद्यामंदिर येथे पार पडली. यावेळी उपस्थित मुख्य क्रीडा अधीकारी राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी MIT माईर्स विश्वशांती गुरकुल जुनिअर कॉलेज वाखरी. पंढरपूर च्या 19 वर्ष वयोगटातील मुलांनी बास्केटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला विजेता संघ कर्णधार तन्मय उद्धव होले. उपकर्णधार प्रशांत हणमंत खरात. कार्तिक कदम .धीरज कदम. उदय खरात. प्रणव जठार. ओम खटकाळे. अबूबकर नदाफ.मोहित कांबळे. तनिष्क देशमाने.राजवीर बोरसुरे.प्रतिक गायकवाड संघाला क्रीडा शिक्षक प्रविण पिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
सर्व खेळाडूंचे हेडमिसस्ट्रेस शिबानी बॅनर्जी . प्रिंसिपल डॉ. स्वप्नील शेठ यांनी अभिनंदन केले.

