पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळते. गौरी-गणपतीसारख्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून महिलांना आपली कला, कल्पकता आणि संस्कृती सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भगिरथ भालके यांनी केले.
स्व. लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन, पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने गौरी-गणपती सणानिमित्त आयोजित गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका साधना सुधीर धोत्रे, रुक्मिणी धनाजी धोत्रे, स्मिता आदित्य फत्तेपूरकर, माजी नगरसेविका सुजाता धुमाळ, अक्षदा राहुल शिंदे-नाईक, संगीतादेवी धुमाळ, सविता बसवेश्वर देवमारे यांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना एकत्र आणणे, त्यांच्या कलाकृतींना व्यापक व्यासपीठ मिळवून देणे तसेच पारंपरिक संस्कृतीचे जतन करताना नव्या कल्पनांना चालना देणे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून महिलांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर आविष्कार सादर केला.
गौरी सजावटीमध्ये पारंपरिकता, आकर्षक मांडणी, सामाजिक संदेश तसेच नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. अनेक महिलांनी घरातील उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून देखणे देखावे साकारले. त्यामुळे या स्पर्धेला केवळ मनोरंजनाचे स्वरूप न राहता महिलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा उपक्रम म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले, असे नगराध्यक्ष डॉ. भालके यांनी सांगितले.
समाजाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा असून, त्यांच्या कलागुणांना आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणारे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत. महिलांना आपली कला सादर करण्यासाठी संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल, असे नगरसेविका स्मिता फत्तेपूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
स्पर्धेतील उत्कृष्ट गौरी सजावट करणाऱ्या विजेत्यांना यावेळी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक : सुनीता सुनील नागणे
द्वितीय क्रमांक : मोहिनी सागर इंगोले
तृतीय क्रमांक : रंजना सिद्धांत रुपनर
चतुर्थ क्रमांक : भाग्यश्री संतोष भोईटे
पाचवा क्रमांक : स्मिता अनिल यादव
उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या महिलांनाही भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अर्चना आसबे, सुरेखा आसबे, स्वाती पाटील, राणी घालमे, कविता नेहतराव, रुपाली हिंगमिरे, अनिता मोरे, रेणुका चव्हाण, मीनाक्षी साळुंखे, काजल साळुंखे, ज्योती दिवटे, केतकी डोंगरे, भाग्यश्री धट, मोहिनी इंगोले, विद्या नागटिळक, प्रज्ञा शिंदे, माधुरी शिंदे, अलका माने, सीमा वट्टमवार, सोनाली पालसांडे, आरती राऊत, संगीता राऊत, कांचन नामदास, अंजली धट यांच्यासह पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनचे बापू भोसले, नवनाथ आसबे, श्रवण काळे, नवनाथ पाटील, सूरज गंगथडे, प्रवीण लिमकर, तात्या नागणे, नवनाथ भिंगारे, आनंदा लामकाने, नगरसेवक विनायक देवमारे, राहुल शिंदे-नाईक आणि गणेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि त्यांच्या कलाविष्कारामुळे या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

