वाडी कुरोली स्वप्नील जमदाडे तेज न्यूज
वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वाडी कुरोली येथे आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रशालेच्या मुलींच्या संघांनी १४, १७ व १९ वर्षे वयोगटात विजेतेपद मिळवत तिहेरी मुकुट पटकावला. तिन्ही वयोगटातील संघांनी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
स्पर्धेनंतर प्रशालेमध्ये सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार प्राचार्य संजय कुलकर्णी , पर्यवेक्षक कुमार गाजरे व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.
विजयी संघ पुढीलप्रमाणे -
१४ वर्षे वयोगट
कर्णधार समृद्धी यलमार, श्रावणी काळे, संस्कृती मासाळ, अनन्या यलमार, जान्हवी यलमार, सायली सातपुते, ईश्वरी काटकर, समृद्धी ननावरे, सृष्टी खाडे, दिशा कांबळे, धनश्री क्षीरसागर, महेजबीन मण्यार.
१७ वर्षे वयोगट
कर्णधार कल्याणी लामकाने, स्नेहा लामकाने, श्रेया यलमार, कार्तिकी यलमार, कोमल पासले, श्रावणी देठे, संध्याराणी घाडगे, भक्ती चौधरी, श्रावणी कस्तुरे, आलिया मुलाणी, तेजश्री मोरे, तृप्ती सावंत, ऋतुजा सुरवसे.
१९ वर्षे वयोगट
कर्णधार समृद्धी सुरवसे, ऋतुजा पासले, प्रणाली साळुंखे, श्रावणी चव्हाण, अमृता खाडे, साक्षी भुई, वैष्णवी साठे, अंकिता नाईकनवरे, आरती शिरोडे, सुकन्या रणे, श्रेया नागणे, श्रेया ननवरे, प्रज्ञा ननवरे, कल्याणी काशिद, कावेरी घाडगे या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे , उपाध्यक्ष बाळासाहेब कौलगे व सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांनी तिन्ही संघांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सलग उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींनी तालुक्यात आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवत प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

