वटवृक्ष देवस्थानच्या विकासासाठी चेअरमन महेश इंगळे यांचे जीवन समर्पण - नगरसेवक सत्यनारायण गुर्रम
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या विकासासाठी चेअरमन महेश इंगळे यांचे जीवन समर्पण असल्याचे मनोगत सोलापूर महानगर पालिकेचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनी व्यक्त केले. नुकतेच सोलापूरचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम व बांधकाम व्यावसायिक अजय बुरा यांनी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला भेट देऊन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी दोघांचाही शाल, श्रीफळ व स्वामींची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक सत्यनारायण गुर्रम बोलत होते.
पुढे बोलताना नगरसेवक सत्यनारायण गुर्रम म्हणाले की श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन म्हणजे मनाला मिळणारी वेगळीच शांती आणि ऊर्जा आहे. आज महेश मालक इंगळे यांच्या हस्ते जो सत्कार झाला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. विकास आणि इथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महेश मालक इंगळे व त्यांची सर्व टीम जे काम करत आहे ते खरोखर वाखाणण्या जोगे आहे. स्वच्छता, शिस्त आणि भक्तांची होणारी काळजी यामुळे अक्कलकोटची ख्याती देशभर वाढली आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने सोलापूर-अक्कलकोटचे नाते अधिक घट्ट होत राहो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, सागर गोंडाळ, तुषार मोरे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

