प्रसिद्ध हिंदी बॉलीवूड सिने अभिनेते गोविंदजी नामदेव यांना सन्मानित
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र पुरस्कृत "हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार" शिंपी समाजाचे भूषण प्रसिद्ध हिंदी बॉलीवुड सिने अभिनेते गोविंदजी नामदेव यांना जाहीर करण्यात आला होता त्यानुसार सदर पुरस्कार आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी त्यांना गोरेगाव मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. समस्त नामदेव
शिंपी समाजाचे भूषण ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते यांना नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने देण्यात येणारा गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार मुंबई पोलीस चे माजी उपायुक्त प्रशांत बगाडे यांच्या शुभहस्ते मानाची पगडी व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नामदेव शिंपी समाज युवक संघाचे राज्याध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी पुरस्काराची प्रस्तावना व उद्दिष्ट याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. तरुणांमध्ये देश भक्ति रुजवण्यासाठी देशासाठी बलिदान देणारे महान हुतात्मा यांचे चरित्र स्मरणात राहणे गरजेचे आहे असे सांगितले.
निलेशजी बंगाळे यांनी स्मृतिचिन्ह वरील लिखित मजकूर सर्वांसमोर मांडला. सन्मानपत्रावरील मजकुराचे किरण कालेकर यांनी सर्वांसमोर वाचन केले हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे जीवन कार्य नामदेव शिंपी समाज युवक संघाचे कार्यकर्ते गणेशजी काकडे यांनी सांगितले थोडक्यात सर्वांसमोर मांडले तसेच सत्कारमूर्ती गोविंद नामदेव यांचा कार्याचा जीवन परिचय प्रशांत खुर्द यांनी आपल्या शब्दात थोडक्यात मांडला.
यावेळी प्रशांत बगाडे यांनी थोर हुतात्मा हिरवे गुरुजी यांच्या नावाने असणारा थोर हुतात्म हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्याचे भाग्य लाभले याचा मोठा आनंद असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. सत्कारमूर्ती गोविंद नामदेव हे मनोगत व्यक्त करताना खूप भाऊक झाले होते हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नावाचा सन्मान स्वीकारताना आपण भारावून गेलो असून यासाठी काय शब्द व्यक्त करावेत हे शब्दच मला सुचत नाहीत असे आनंदाश्रू काढत गोविंदजी नामदेव यांनी खूप भावनिक उद्गार काढले यावेळी उपस्थित सर्वजण ही भारावून गेले सर्व नामदेव शिंपी समाज युवक संघाच्या नियोजन समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांच्या हस्ते प्रशांजी बगाडे यांचा सन्मान करण्यात आला तसेच सन्मान मूर्ती गोविंद नामदेव यांच्या पत्नी सुधा नामदेव यांचा सन्मान हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नातू शशांक हिरवे यांच्या शुभहस्ते महालक्ष्मीची मूर्ती भेट देऊन करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निलेशजी बोंगाळे रवींद्र कालेकर अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ कोकण विभाग अध्यक्ष तसेच नारायण धोंगडे नामदेव शिंपी समाज युवक संघ अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष, गणेशजी काकडे वानेवाडी गाव पोलीस पाटील, नामदेव शिंपी समाज युवक संघाचे पुणे जिल्हा सचिव निलेश काळे नामदेव शिंदे शिंपी संभाजी युवक संघाचे कार्यकर्ते हर्ष भोंडवे, मुंबई विभाग प्रमुख साईनाथ जी रोडे ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख किरणजी कालेकर प्रशांत हिरवे राजेंद्र कालेकर शुभांगी बहुलेकर पुणे विभाग प्रमुख, शिंपी बिझनेस फोरम उदय खांडके चेअरमन,शिंपी बिझनेस फोरम, पुणे. प्रशांत हिरवे सेक्रेटरी,शिंपी बिझनेस फोरम, पुणे. राजेंद्र चुंबळकर उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत नामदेव शिंपी समाजसेवक संघाचे मुंबई विभाग प्रमुख साईनाथ रोडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठवाडा विभाग प्रमुख बीड जिल्हाध्यक्ष चक्रधर हेंद्रे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित राहिल्याबद्दल निलेश काळे यांनी आभार मानले.

