सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विश्वशांती आणि मानवकल्याणासोबतच लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, या संकल्पनेतून ड्रीम फाउंडेशन परिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट, राजमाता जिजाऊ महिला मंच, चाणक्य गुरुकुल व श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र यांच्या वतीने विशेष जलाभिषेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी भारताच्या दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम भागात वाहणाऱ्या ५१ नद्यांचे पवित्र जल, तसेच ५१ पवित्र कुंड, तीर्थ, ९ ज्योतिर्लिंग व विविध सरोवरांतील जल संकलित करण्यात आले आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील महाकुंभाचे कुशावर्त कुंड, नाशिक येथील रामकुंड, कुरुक्षेत्र येथील ब्रह्मसरोवर, अजमेर-पुष्कर येथील ब्रह्मा मंदिराचे जल, तसेच रामेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील २२ कुंडांचे जल यांचा समावेश आहे.
हे पवित्र जल १५ मार्च २०२६ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संकलित करण्यात आले आहे. या जलाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत जलाभिषेक करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा संकल्प काशिनाथ गजराबाई गुरुशांत भतगुणकी परिवार यांच्या वतीने करण्यात आला आहे.
उपक्रमासाठी बालाजी उद्योग समूहाचे उद्योजक श्री. राम रेड्डी, श्री. रमेश बिराजदार व श्री. बसनिंगप्पा हिपरगे साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
जलाभिषेक होणारी प्रमुख मंदिरे
१. विश्वरूप शिवलिंग, हत्तरसंग कुडल
२. श्री जागृत मारुती मंदिर, हत्तरसंग
३. श्री रेवनसिद्धेश्वर मंदिर
४. श्री सिद्धेश्वर मंदिर
५. श्री मार्कंडेय महामुनी महाराज मंदिर
६. श्री रूपाभवानी माता मंदिर
७. श्री पंचलिंग परमेश्वर मंदिर
८. श्री स्वामी समर्थ मंदिर
९. श्री सिद्धारूढ शरण मठ
१०. श्री परमेश्वर मंदिर, वागदरी
११. श्री जागृत मारुती मंदिर, गौडगाव
१२. श्री काशी विश्वेश्वर मंदिर, जेऊर
१३. श्री तुप्पीन मठ, नागणसूर
१४. श्री सोमेश्वर मंदिर
१५. श्री महालिंगेश्वर मंदिर
१६. श्री संगमा देवी मंदिर, संगम वस्ती
१७. श्री अमोगसिद्ध मंदिर, मंद्रूप
१८. श्री बसवेश्वर मंदिर, भतगुणकी
१९. श्री महादेव मंदिर
२०. श्री गजानन महाराज मंदिर
२१. श्री साईबाबा मंदिर
“ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करत विश्वशांती, मानवकल्याण आणि चांगल्या पावसासाठी हा धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी या जलाभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने काशिनाथ भतगुणकी करण्यात आले आहे.


