म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का ?
सांगली प्रतिनिधी तेज न्यूज
यंदाच्या हंगामात ऊसाला 5500 रुपये दर मिळावा अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. यानंतर माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तुमच्या काकांनी ठेवलाय का असा सवाल केला होता.
यानंतर आता राजू शेट्टी यांनी जोरदार पलटवार केला आहे. 50 रूपये साखरेची एमएसपी व 70 रूपये इथेनॅालचा दर करून आम्ही पाच हजार रूपये उसाचा दर मागितला आहे. तुम्ही अनेक वर्षे साखर संघाचे अध्यक्ष म्हणून खूर्ची उबवली, तरी गेल्या आठ वर्षात साखरेची एमएसपी वाढली नाही तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का? ऊसाचा दर जाहीर न करता ऊस तोडायला ती काय तुमच्या बापाची पेंड आहे का? असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महामार्ग रोखणार
दुसरीकडे, आज (13 ऑक्टोबर) महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर महामार्गावर कोगनोळीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महामार्ग रोखून आंदोलन करणार आहे. इथेनॉल आणि साखरेची दर वाढ व्हावी यासाठी हे आंदोलन असणार आहे. दुसरीकडे, दिल्लीत या संदर्भात बैठक होती मात्र या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही. त्यामुळे कोगनोळी टोल नाक्यावर महामार्ग रोखो आंदोलन होणार आहे. जोपर्यंत याबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. या आंदोलनात महाराष्ट्र आणि सीमाभागातील शेतकरी सहभागी होणार आहेत. वाहतुकीला कोणताही अडचणी निर्माण होऊ नये, अशा पद्धतीची भूमिका कर्नाटक पोलिसांनी घेतली आहे. आंदोलकांना महामार्गाच्या कडेला आंदोलन करण्यात परवानगी दिली जाईल. मात्र, वाहतूक रोखू दिली जाणार नाही असेही कर्नाटक पोलिसांनी स्पष्ट केला आहे. अवजड वाहनांना महामार्गावर येऊ नये असं आवाहन केलं आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये महामार्गावर एकूण तीन ठिकाणी हे आंदोलन केले आहे. त्यासाठी तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात केल्याची माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली..
शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही
दरम्यान, दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र पुसा येथे पार पडली. केंद्रीय कृषी मंत्री यावेळी बोलताना म्हणाले, की आम्ही दरवर्षीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मध्ये वाढ करून दिली आहे.
यावर बोलताना शेट्टी म्हणाले, तुमच्या विभागाने एफआरपी वाढविलेल्याचे सादरीकरण केले मात्र खते, कीटकनाशके, औषधे, मजूरी व तोडणी वाहतूक, साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च कितीने वाढली याची पण माहिती घ्या हि माहिती व याबाबतचे वास्तव सांगण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून वेळ मागत आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ नसल्याचे बैठकीत खडसावून सांगितले. साखरेचा हमीभाव गेल्या आठ वर्षात न वाढल्याने साखरेवर दिले जाणारे कर्ज कमी मिळत असल्याने कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत असल्याचे सांगितले.
जरी केंद्र सरकारने एफआरपी मध्ये वाढ केली असली एफआरपीचा बेस वाढविल्याने त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही. केंद्र सरकारने या तीन मागण्यावर तातडीने निर्णय न घेतल्यास उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग बंद करून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर सुध्दा अडविणार असल्याचे सांगितले.

