पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त मौजे सरकोली, ता. पंढरपूर येथील सर्व महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा पंढरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी दिली.
या यात्रेदरम्यान महिलांना श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, अक्कलकोट; श्री तुळजाभवानी माता मंदिर, तुळजापूर; श्री मार्डी येथील देवस्थान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे.
आज अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन महिलांनी प्रसादाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे महिलांना भक्तिभावाने देवदर्शन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

