पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कडून श्रीमती स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. स्मिता जाधव या पुढारी समुहाच्या योगेश जाधव यांच्या पत्नी तथा सतेज (बंटी) पाटील यांच्या भाची आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाकडून हर्षदा जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. हर्षदा जाधव या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत तथा कल्याण जाधव (KJEI) ग्रुप चे सर्वेसर्वा यांच्या सूनबाई आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांचा आहे. पाच जिल्ह्यातील मिळून जवळपास 3 लाख 11 हजार मतदार आहेत.
तर प्रचंड मोठा भक्कम राजकीय वारसा लाभलेल्या दोन्ही उमेदवार या मतदारसंघात समोरासमोर लढतील. पुणे पदवीधर मतदार यांच्यापैकी कुणाच्या पारड्यात स्वतःचे मत टाकतील असे तुम्हाला वाटते?

