पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मितादेवी योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण उपस्थित होते दोन्ही उमेदवारांना निवडणुकीसाठी चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आ. अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, यांच्यासह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

