पळशी प्रतिनिधी अशोक लोखंडे तेज न्यूज
मा. अजितदादा पवार कनिष्ठ महाविद्यालय, पळशी या महाविद्यालयातील विद्यार्थी सतीश राजू माने याने 65 किलो वजनी गटात पंढरपूर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे.
त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी त्याचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सौदागर झांबरे , प्रा. अशोक लोखंडे-पाटील , क्रीडा मार्गदर्शक प्रा. संजयजी चव्हाण , प्रशालेचे नंदकुमार फाटे , नवलकुमार काळे यांनी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

