मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
माजी सैनिक चंद्रशेखर सावंत पश्चिम रेल्वे मध्ये मोटरमन म्हणून कार्यरत असताना ०३ जुलै २९१८रोजी अंधेरी येथील गोखले पुल कोसळत असताना एमर्जेन्सी ब्रेक लावून चर्चगेट लोकल पुलाच्या आधी थांबविली होती. त्यामुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण तसेच रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसानही वाचले होते. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रूपये ५ लाख बक्षीस देऊन गौरव केला.तसेच त्यांच्या देशसेवा व सामाजिक सेवेबद्दल नुकताच त्यांना सैनिक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांनी "सैनिक रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराची मीरा भाईंदर चे आमदार नरेंद्र मेहताजी यांनी दखल घेऊन अभिनंदन व कौतुक केले.त्याचबरोबर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस स्थानकावर विस्तारीकरण व विकास करण्याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्यातर्फे निवेदन दिले.
आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमच्या प्रतिनिधी यांना दिले.यावेळी माजी सैनिक चंद्रशेखर सावंत यांच्या बरोबर हरेश सावंत हजर राहिले.

