सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
हैदराबाद येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था म्हणजेच NIRDPR च्या 'जनरल डायरेक्टर' (महानिदेशक पदी) रोहिणी भाजी भाकरे यांची निवड झाली आहे.
याविषयी माढा पंढरपूर विधानसभाचे आ. अभिजित पाटील म्हणाले की ताई, आम्हाला आपला अभिमान आहे!! रोहिणीताई भाजीभाकरे यांनी पुन्हा एकदा माढ्याची मान अभिमानाने उंचावली..
हैदराबाद येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था म्हणजेच NIRDPR च्या 'जनरल डायरेक्टर' (महानिदेशक पदी) त्यांची निवड झाली आहे..
उपळाई बुद्रूकच्या या लेकीने आधी नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामविकास विभागात संयुक्त सचिव म्हणून देशाच्या ग्रामीण धोरणांना आकार दिला.. आता त्याच क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ आता संपूर्ण देशातील ग्रामीण विकासाला होणार आहे..
ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे हे मी वारंवार म्हणतोच.. पण, रोहिणीताईंनी हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. माढ्यातील प्रत्येक युवकांनं यातून आदर्श घेतला पाहिजे.
रोहिणीताई, मनापासून अभिनंदन! तुमची वाटचाल अशीच उत्तुंग राहो..

