नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामींच्या दरबारात आल्यावर मनाला अपार शांती मिळते. स्वामी भक्तांना दर्शन घडवणे हीच माझ्यासाठी खरी सेवा आहे. गतवर्षी श्री दत्त जयंती कालावधीत पुण्यातील ५००० भक्तांना अक्कलकोटची वारी घडवली होती, त्याचे पुण्य व फळ स्वामींनी नगरसेविका पदाच्या माध्यमातून दिले आहे. नुसते फळच दिले असे नाही तर त्याच कालावधीत पार पडलेल्या पुण्यातील नगरसेवक पदाच्या निवडणूकीत सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा अभिमान बाळगण्याची संधी श्री स्वामी समर्थांनी दिली आहे, म्हणून जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय असल्याचे मनोगत पुणे शहरातील विक्रमी मतांनी निवडून आलेल्या नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी व्यक्त केले.
आज नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी कुटुंबासह येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामीं समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी नगरसेविका रत्नमाला संदीप सातव बोलत होत्या.
पुढे बोलताना नगरसेविका रत्नमाला सातव म्हणाल्या की आम्ही अक्कलकोट तालुक्यातील गोगावच्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे आमच्या स्नेही आहेत तसेच सातव कुंटूंबीय निस्सीम स्वामीभक्त आणि लोकसेवक आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून भक्तसेवा आणि जनसेवेचे कार्य करत आहोत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपणास तब्बल २३,१३६ मतांनी मिळालेल्या विक्रमी मतांचा विजयी निकाल या कार्याचा आणि स्वामी कृपेचा पुरावा आहे. यापुढेही स्वामींचा आशीर्वाद असाच राहो आणि माझ्या कडून अधिकाधिक जनसेवा घडो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली प्रार्थना आहे. येथील वटवृक्ष मंदीरातील आदरतिथ्य व स्वामींची कृपा हे जीवनातील शास्वत सत्य आहे. येथे करण्यात आलेल्या आदरतिथ्याबद्दल आपण मंदिर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांचे ऋणी आहोत, तसेच मंदिर समितीचे व आमचे मित्र श्रीशैल गवंडी यांचेही नेहमीच आम्हाला सहकार्य असते त्यांचेही आम्ही मनापासून ऋणी आहोत असेही मनोगत व्यक्त केले.
यावेळी देवस्थान व्यवस्थापनाने त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, रूद्रय्या स्वामी आदींसह स्वामी भक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

