"मैत्री म्हणजे शब्दांशिवाय समजणारा संवाद आणि संकटात पाठीशी उभा राहणारा एक भक्कम आधार!"
मुंबई, परेल प्रतिनिधी माहेश्वर तेटाबे तेज न्यूज
' फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने लक्ष्मी कराओके स्टुडिओ मध्ये रंगलेला मैत्रीचा सोहळा म्हणजे केवळ गाण्यांचा कार्यक्रम नव्हता, तर तो आमच्या गोड कुटुंबाचा एक सुंदर प्रवास होता. आजच्या या विशेष दिवशी फक्त आणि फक्त मैत्रीदिनाची गीते गाऊन सर्व गायकांनी या सुंदर दिवसाला एक वेगळाच उजाळा दिला! आमचे लाडके डॉ. मंगेश भाऊ (जे समाजसेवा आणि मैत्रीचे जिवंत प्रतीक आहेत) यांनी दोन विशेष मैत्रीचे केक आणून या दिवसाची गोडी अधिकच वाढवली.
त्याबद्दल लक्ष्मी कराओके स्टुडिओच्या वतीने मनापासून आभार! या सोहळ्यात आमचे स्टुडिओचे आधारस्तंभ रामजी दादा आणि सौ. लक्ष्मी भाभी यांच्या हस्ते डॉ मंगेश भाऊ यांनी आणलेला केक कापून सर्व गायकांचे तोंड गोड करण्यात आले. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि प्रेमळ आतिथ्यामुळे हा संपूर्ण मैत्री सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला, ज्याचे संपूर्ण श्रेय या दिलदार जोडीला जाते.
तसेच सुरेल आवाजाची जादू पसरवणारे आमचे सर्व गायक-गायिका मित्रविजय भाऊ, शैलेश भाऊ, तुषार भाऊ, बाबू, पांडुरंग भाऊ, दिनेश, निमेश, दत्ता, पूजा वहिनी, निशा ताई, विनोद...तसेच सर्वांचे लाडके आबा पवार, तावडे साहेब, छोटे उस्ताद वरद आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित कलाकार या सर्वांच्या साथीने आणि गायकीने हा सोहळा खऱ्या अर्थाने उजळून निघाला.
(अनावधानाने कुणाचे नाव राहिल्यास क्षमस्व!) आजच्या या आनंदाच्या क्षणी आमचे साउंड इंजिनिअर काफिल भाई, तसेच हसमुख, अर्चना ताई, निलेश, शारदा ताई, रुची, अशोक दादा, निवेदिका लता आणि इतर सर्व मित्रमंडळींची उणीव प्रकर्षाने जाणवली;
पण प्रत्येकाच्या मनातली आपुलकी कायम सोबत होती! प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तो आपसूक आनंद आणि संगीताची ही जोड म्हणजेच आमची खरी संपत्ती.
*"मिळाल्या अशा मैफिलीत*
*जिथे सुरांनाही स्पंदने लाभली,*
*लक्ष्मी स्टुडिओच्या अंगणात*
*मैत्रीची नवी पहाट झाली!"*

