माढा प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मतदारसंघातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, गरजू नागरिकांना अन्नधान्य व फळांचे वाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याशिवाय कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी अभिष्टचिंतन कार्यक्रम, केक कापून वाढदिवस साजरा करणे तसेच नागरिकांशी संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजहिताचे उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत यंदाही मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अशी माहिती सचिव नितीन सरडे यांनी तेज न्यूजला दिली.

