मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
सैनिक फेडरेशन , महाराष्ट्र राज्य आयोजित कारगिल विजय दिवस, सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळा आणि सैनिक रत्न पुरस्कार सोहळा दिनांक २६जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात शहीद स्मारक , बीएमसी,मुख्यालयासमोर, मुंबई येथे शहीदांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर राजश्री शाहू महाराज सभागृह, दादर येथे सैनिक रत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात माजी सैनिक चंद्रशेखर सावंत यांनी मोटरमन , पश्चिम रेल्वे येथे कार्यरत असताना ०३जुलै २०१८ रोजी अंधेरी येथे गोखले पुल कोसळत असताना एमर्जेन्सी ब्रेक लावून चर्चगेट लोकल पुलाच्या आधी थांबविली होती. त्यामुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण तसेच रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसानही वाचले होते. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांनी रूपये ५ लाख बक्षीस देऊन गौरव केला. त्यांच्या देशसेवा व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाज रत्न हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला सैनिक फेडरेशन चे अध्यक्ष मा. खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने सैनिक,माजी सैनिक परिवार, वीर नारी,सैनिक मित्र व नागरिक उपस्थित होते.

