मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये मोतीशाहलेन पब्लिक शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रेया संदीप जाधव हिने सेमी इंग्रजी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले. तसेच रामदास हर्याण याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाची भर घातली.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन व नियोजन महत्त्वाचे ठरले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून दिले. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश मिळविले.
या यशाबद्दल शाळेतील माध्यमिक शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून विद्यार्थ्यांवर व शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

