अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
अक्कलकोट ही स्वामी समर्थांच्या चरणांनी पावन झालेली भूमी आहे. येथे आल्यावर मनाला अत्यंत शांती आणि समाधान मिळते. देवस्थान मंदिर समितीने भाविकांसाठी केलेल्या सुविधा खरोखर कौतुकास्पद आहेत. स्वच्छता, शिस्त आणि भक्तांसाठी असणारी व्यवस्था पाहून अभिमान वाटला. चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली देवस्थानचा विकास वेगाने होत आहे.
धार्मिकते सोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही देवस्थान समितीचे योगदान मोलाचे असल्याचे मनोगत माजी विधानसभा सभापती तथा माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस नेते नाना भाऊ पटोले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी नाना भाऊ पटोले यांचा सपत्निक स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी नाना भाऊ पटोले बोलत होते.
दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता, सुविधा आणि भाविकांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी केली. स्वामींच्या आशीर्वादाने हे देवस्थान जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान बनो आणि मी पुन्हा पुन्हा येथे येऊन स्वामींचे दर्शन घेत राहो असेही मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील तसेच देवस्थानचे पदाधिकारी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, समर्थ स्वामी, तुषार मोरे, धनराज स्वामी, स्वप्निल गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

