अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील उद्योग, व्यापार आणि रोजगारवाढीसाठी स्वामींचा आशीर्वाद लाभावा यासाठी आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आहे. अक्कलकोट ही केवळ धार्मिक नगरी नसून येथील भक्ती आणि श्रद्धेची शक्ती संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देते. राज्याच्या औद्योगिक विकासातही हीच सकारात्मक ऊर्जा कामाला येईल असे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी खासदार ज्योतीताई वाघमारे, मा.मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अमोल बापू शिंदे, शिवसेना नेते मनिष काळजे, संतोष पाटील, प्रविण तानवडे, विनोद मोरे, रविनाताई राठोड, महेश साठे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, रमेश शिंदे सर व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

