सिनेसृष्टीतील पहिले यशस्वी सुपरस्टार राजेश खन्ना.......
" बाबू मोशाय.... जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है.... जहाँ पनाह..जिसे ना आप बदल सकते है ना मैं...हम सब तो रंग मंचकी कठपुतलिया है,जिसकी डोर उपरवाले की ऊंगलियों में बंधी है....कौन..कब.. कैसे..उठेगा..कोई नहीं बता सकता.....". सिनेसृष्टीतील पहिले यशस्वी सुपरस्टार राजेश खन्ना . ऋषीकेश मुखर्जी यांच्या ' आनंद ' सिनेमातील भूमिका सिनेमाजगत मध्ये एक मैलाचा दगड ठरला.सुरुवातीपासूनच रोमँटिक भूमिका करणाऱ्या राजेश खन्नाने ' आनंद ' मधील अभिनेत्याला अभिनेत्रीच नाही या कारणांमुळे भूमिका करण्यास नकार दिला होता.पण नंतर होकार दिला होता.' आनंद ' चित्रपट प्रचंड गाजला.असेच शक्ती सामंतच्या ' आराधना ' वेळीही घडले.' आराधना 'हा सिनेमा नायिका प्रधान असल्याने राजेश खन्नाने यात भूमिका करण्यास नकार दिला होता,पण शक्ती सामंतने राजेश खन्नाची समजूत काढून भूमिका करायला भाग पाडले.आणि ' आराधना ' ही प्रचंड गाजला.राजेश खन्नाचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाब राज्यातील अमृतसर या गावी झाला.त्याचे सुरुवातीचे नाव जतीन खन्ना असे होते.सिनेमासृष्टीत प्रेमाने त्यांना ' काका ' या टोपणनावाने ओळखत असत.त्यांचे वडील लाला हिराचंद हे हेडमास्तर होते,व आईचे नाव चंद्राणी होते.पण त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना दत्तक घेतले त्यांचे नाव चुन्नीलाल खन्ना व आई लिलावती खन्ना.१९३५ मध्ये लाहोर मधून त्यांचे आईवडील अमृतसरला आले.१९४२ ला राजेश खन्नाचा जन्म अमृतसर येथे झाल्यानंतर ते कुटुंब पुन्हा मुंबईतील ठाकूरद्वार येथील सरस्वती निवास मध्ये राहू लागले.त्यावेळी राजेश खन्ना आणि रवी कपूर म्हणजेच आताचे लोकप्रिय अभिनेते जितेंद्र यांच्या शी ओळख झाली
राजेश खन्ना चे काका के.के.खन्ना यांनी जतीन ऐवजी राजेश हे नाव ठेवले.तेव्हापासून जतीन खन्ना हे राजेश खन्ना झाले.राजेश खन्ना या आपल्या नावाचा राजेश खन्ना ला फारच अभिमान होता.राजेश खन्ना यांनी एकूण १७० चित्रपटात काम केले.वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजेच १९६६मध्ये त्यांनी " आखरी खत" या चित्रपटापासून आपल्या चित्रपट कार्य किर्दीला सुरुवात केली.पण हा चित्रपट १९७१ ला प्रदर्शित झाला.' अंजु महेंद्र ' या अभिनेत्री बरोबर.१९६६ ते १९७२ पर्यंत राजेश खन्ना चे प्रेम प्रकरण गाजत होते.नंतर त्यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाला.पुढे १९७३ मध्ये डिंपल कपाडिया बरोबर विवाह झाला.दोघामध्ये जवळ जवळ १६ वर्षाचे अंतर होते.बाॅबी या चित्रपटाचे निर्माण पूर्ण ही झाले नव्हते.त्या काळी राजेश खन्ना चे १५ते १६ चित्रपट सुपरहिट झाले.मुमताज बरोबरचे राज खोसलाचे राजेश खन्ना बरोबर दो रास्ते, सच्चा झुठा, दुश्मन हे प्रचंड गाजले.स्वप्नसुंदरी हेमा मालिनी बरोबर राजेश खन्ना यांनी १३ चित्रपटात काम केले.१९६९ चा आराधना सुपर हिट झाला.अभिनेत्री शर्मिला टागोर होती.खामोशी मध्ये वहिदा रेहमान नी भूमिका केली.झिनत अमान,लिना चंदावरकर,राखी, मौसमी चटर्जी, रेखा, तनुजा, वगैरे वगैरे अभिनेत्री बरोबर राजेश खन्ना ने चित्रपटात भूमिका केल्या.पण वैजयंती माला व नूतन बरोबर राजेश खन्ना ने भूमिका केल्या नाहीत.साधना, नंदा, आशा पारेख,माला सिन्हा,रिना रॉय, विद्या सिन्हा, सुलक्षणा पंडित वगैरे वगैरे अभिनेत्री बरोबर राजेश खन्ना ने भूमिका केल्या.राजेश खन्नाना चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती, पैसा प्रसिद्धी मिळवून दिली.पुढे त्यांना दोन मुली झाल्या.टिंक्कल, आणि रिंकू, आता चे बालीवुडचे अभिनेते अक्षय कुमार हे राजेश खन्ना चे जावई होय.बी.आर.चौप्रा,जी.पी.सिप्पी, मोहन सैगल, मनमोहन देसाई, शक्ती सामंत,चेतन आनंद,राज खोसला, ऋषिकेश मुखर्जी, यांच्या चित्रपटात राजेश खन्ना यांनी काम केले, अभिनेता शम्मी कपूर निर्मित " महाचोर ' चित्रपटात त्यांनी काम केले आहे, अभिनेत्री निंतू सिंह यांच्या बरोबर.जवळ जवळ सर्व संगीतकारांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले आहे.गायक किशोर कुमार,मो.रफीं, मुकेश, हेमंत कुमार, या गायकांनी राजेश खन्ना साठी गाणी गायली, राजेश खन्नाला तीन बेस्ट अक्टर व दोन फिल्म फेअर चे पुरस्कार मिळाले,अमर प्रेम मधील" पुष्पा..आय हेट टेर..." हां संवाद खूप गाजला.आपला संवाद ते विशिष्ट स्टाईल मध्ये म्हणत असत." इज्जते,शौहरते,उल्फते, चाहते,सब इस दुनिया में रहता नहीं है,...आज मैं हूं जहाँ,कल कोई और था,वो भी एक दौर है,यह भी एक दौर है," हा त्यांचा प्रसिद्ध संवाद होता.क्षणभर डोळे बंद करून मानेला विशिष्ट पद्धतीने झटका देऊन मान वाकडी करून मिश्किल हसणे, या राजेश खन्ना च्या अदावर प्रेक्षक जाम खुश व्हायचे.वाढत्या वयाची व आजारपणाची जाणीव राजेश खन्ना ला दिग्दर्शक रविंद्र दवे यांनी करून दिली.ट्रकभरुन येणाऱ्या गुलदस्त्याची हळूहळू कमी होत गेली.राजेश खन्ना आयुष्य भर मन मानेल तसे वागले.कांग्रेस पक्षामार्फत ते पार्लमेंट मधे निवडून गेले.३ में २०१३ ला टपाल खात्याने डाक तिकीट प्रदर्शित केले.गिरगाव मधील एका चौकाला राजेश खन्ना हे नाव दिले.राजेश खन्नाने राजेंद्र कुमार कडून ३१ लाखाला बंगला विकत घेतला,त्याचे नाव आशिर्वाद ठेवले होते.१८ जुलै २०१२ रोजी या अभिनेत्याचे निधन झाले.काॅलेज मध्ये असताना वर्गात मुला मुलींची संख्या कमी दिसली की आमचे सर म्हणायचे," आज गावात राजेश खन्ना चा सिनेमा तर लागलेला नाही ना.."
लेखक - भारत कवितके
मुंबई कांदिवली पश्चिम.

