भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई मधील बहारदार लावणी कार्यक्रम त्रिवेणी सामना प्रेक्षकांना भुरळ घालत असल्याचे दिसून येत आहे.गुरुमाऊली प्राॅडक्शन विषुशा निर्मित आणि अर्चना थिएटर निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच पारंपरिक लावणी व बॉलिवूड लावणी, लोकगीते त्रिवेणी सामना या लावणी कार्यक्रमात धमाल उडवून दिली.या कार्यक्रमाचे निर्माता, संकल्पना, दिग्दर्शक प्रमोद कांदळकर आहेत.नृत्य दिग्दर्शक राजेश गमरे यांनी केले आहे.
लावणी नृत्यांगना प्रमोद कांदळकर,अक्षय मालवणकर, सुशांत सावंत, किन्नर लावण्यवती साक्षी मुंबईकर,अक्षरा पाटील, नयना परमार, लावण्यवती पल्लवी थोरवे, सरिता माने,हर्षा राऊत ढगळे, राजेश गमरे आणि इतर महिला व पुरुष कलाकारांनी आपली कला सादर करुन मुंबईकरांची मने जिंकली.या कार्यक्रमात गणेश वंदना, गौळण, मुजरा,लोकगीते देव धनगर वाड्यात घुसला, जाताना मोबाईल नंबर देऊन जा, पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची,ह्यो लय भरलाय मनात ग,मी मौसंबी मी नारिंगी, वगैरे वगैरे सारख्या लावण्या सादर केल्या.
एकंदरीत हा लावणी कार्यक्रम मुंबईकरांना भुरळ पाडत असल्याचे दिसून येत, कलाकारा सोबत नेपथ्य, निवेदन, संगीत,लाईट, वेशभूषा, या बाजू ही उत्कृष्ट कार्य होते . या लावणी कार्यक्रमाला आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना दिग्दर्शक प्रमोद कांदळकर यांनी निमंत्रित केले होते.

