पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘एरोसिस एचव्हीएसी प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘एरोसिस एचव्हीएसी प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अक्षता लक्ष्मण खताळ, प्रतिक्षा नवनाथ चौगुले, आदित्य गिरीश पवार, माऊली संजय गोरे व संकेत संतोष मगर या पाच विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक रुपये चार लाखांचे पॅकेज मिळाले आहे. ही कंपनी प्रामुख्याने एचव्हीएसी या क्षेत्रात कार्यरत आहे. एचव्हीएसी हे एक विशेष कार्यक्षेत्र आहे, त्याचा उपयोग फार्मसी, दवाखाने, मेकॅनिकल आणि इतर बऱ्याच विभागात होतो. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांंना महाविद्यालयाकडून नोकरीच्या ४७३ पेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून ‘एरोसिस एचव्हीएसी प्रायव्हेट लिमिटेड’या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना
शै. वर्ष २०२५-२०२६ मध्ये प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अजूनही कांही कंपन्यांचे रिझल्ट्स येणे बाकी आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, स्वेरीची आदरयुक्त शिक्षणसंस्कृती, रात्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध प्रकारचे प्रशिक्षण आदी बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये होणारी निवड होय.

