पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेल्या 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलना'ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा जाहीर केला पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पवार यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
शिवसेना UBT पक्ष, पंढरपूर विभाग, तालुका व शहर यांच्यावतीने मा. आमदार रोहित पवार यांना लिहिलेल्या पत्रात शेतकरी हिताच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
आंदोलनाची मागणी काय ?
रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी दोन प्रमुख मागण्या आहेत:
1. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अटीशिवाय 'सरसकट कर्जमाफी' देण्यात यावी.
2. शासनाने पूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांसाठी असलेल्या 'जाचक अटी' तात्काळ रद्द करण्यात याव्यात.
पत्रात म्हटले आहे की, "राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या हक्कांसाठी आपण उभारलेला हा लढा अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या अन्नत्याग आंदोलनास आम्ही जाहीर व संपूर्ण पाठिंबा व्यक्त करीत आहोत.
शासनाने शेतकरी हिताच्या या मागण्यांचा तातडीने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी प्रामाणिक अपेक्षा शिवसेना UBT, पंढरपूरकडून व्यक्त करण्यात आली आहे.


