महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिल निवडणूकीत विजयी हॅट्रीक साधल्याबद्दल ॲड.मिलींद थोबडे यांनी घेतले स्वामींचे आशिर्वाद.
महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चेअरमन महेश इंगळे यांनी केला ॲड.मिलींद थोबडे यांचा स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
थोबडे कुटूंबीय हे श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने बार कौन्सिलच्या निवडणूकीतील विजयी हॅट्रीक मध्ये स्वामींचे आशिर्वादही मोलाचे असल्याचे प्रतिपादन सोलापूर येथील जेष्ठ विधीज्ञ ॲड.मिलींद थोबडे यांनी केले.
नुकतेच पार पडलेल्या महाराष्ट्र अणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणूकीत तब्बल ३८२९ मतांनी विजय संपादन करून विजयी हॅट्रीक साधल्याबद्दल ॲड.मिलींद थोबडे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून आपले आराध्य दैवत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी ॲड.मिलींद थोबडे यांची विजयी हॅट्रीकने महाराष्ट्र अणि गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. मिलींद थोबडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲड.मिलींद थोबडे बोलत होते.
पुढे बोलताना ॲड.मिलींद थोबडे यांनी श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त असल्याने श्री स्वामी कृपेचे ऋण त्यांचे दर्शन घेऊन फेडण्यासारखे दुसरे पुण्य नाही असेही भावोद्गार काढले आणि आज येथे मंदीर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदरतिथ्या बद्दल व मान सन्माना बद्दल चेअरमन महेश इंगळे यांचे आभार मानले.
यावेळी ॲड.अनिल मंगरुळे, ॲड.हेमंत साका, ॲड. निशांत लोंढे, ॲड.जाधव, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, प्रथमेश इंगळे, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, सागर गोंडाळ, संतोष पराणे, प्रा.शिवशरण अचलेर, संदीप पंडीत, गिरीश पवार, डॉ.हिरण्णा पाटील आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


